Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर स्मारकाचे ना वर्क आॅर्डर, ना टेंडर - मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 05:41 IST

बिहारच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते

मुंबई : बिहारच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. मात्र त्यानंतर तीन वर्षात काहीच हालचाल झाली नाही. स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही. ना टेंडर काढण्यात आले ना वर्क आॅर्डर निघाली. सरकार केवळ दिशाभूल करत आहे, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. दरवर्षी ६ डिसेंबर तारीख आली की, खोदकाम सुरु करुन लोकांची दिशाभूल केली जाते. स्मारकाचे काम रेंगाळत ठेवण्या मागे सरकारचा डाव असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.