Join us

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन

By admin | Updated: June 2, 2014 04:22 IST

गतवर्षीपेक्षा तानसा धरण वगळता भातसा व तानसा या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा अधिक आहे.

भातसानगर : गतवर्षीपेक्षा तानसा धरण वगळता भातसा व तानसा या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा अधिक आहे. तानसा धरणातील पाणीसाठा तुरळक प्रमाणात कमी असला तरी तो समाधानकारक असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. मे महिनाअखेरपर्यंत भातसा, तानसा, वैतरणा या तिन्ही धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी होत असतो. या कमी झालेल्या साठ्यामुळे मुंबई महानगर पालिका पाणीकपातही करत असते. मात्र २०१३-१४ मध्ये उत्तम प्रकारे पडलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे या तिन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट टळणार आहे. (वार्ताहर)