Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीमांकनाशिवाय जागा देणार नाही

By admin | Updated: June 2, 2015 22:35 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाकरिता योग्य सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तसूभरही जागा शेतकरी देणार नाहीत असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला

अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाकरिता योग्य सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तसूभरही जागा शेतकरी देणार नाहीत असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असल्याची माहिती मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग रु ंदीकरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे समन्वयक संतोष ठाकूर यांनी दिली आहे.सोमवारी भूसंपादन अधिकारी तथा पेण उप विभागीय अधिकारी किरण पाणबुडे यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिनियमानुसार शिरढोण, पळस्पे आणि कर्नाळा येथील खातेदारांना मूल्यांकनाविषयीच्या सुनावणीसाठी पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलावले होते. यावेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे समन्वयक संतोष ठाकूर, युसुफ मेहेरअली सेंटरचे मधू मोहिते, भरत सोनी यांच्या समवेत महामार्ग प्रकल्पबाधित सर्व खातेदारांनी सक्षम प्राधिकारी किरण पाणबुडे यांना ३ डची प्रक्रि या पूर्ण न करता कलम ३ गची अधिसूचना कशी काढलीत असा सवाल केला. भूसंपादन कार्यालयाकडून खातेदारांची फसवणूक होत असल्याचे सांगून भूसंपादनातील त्रुटी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देखील कारवाई होत नाही. त्यामुळे यापुढे जोपर्यंत योग्य सीमांकनाची प्रक्रि या पूर्ण होत नाही, जोपर्यंत गावठाण विस्तार करत नाहीत आणि सध्या असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा १५ मीटरमधील बाधितांना पूर्ण मोबदला देण्याचे निश्चित होत नाही, तोपर्यंत तसूभर जागाही देणार नाही असे प्रकल्पग्रस्त खातेदारांनी व्यक्त केले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.