मुंबई : मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे समाजातील तत्कालीन विषयांवर भाष्य केले जाते. त्याचप्रमाणे यात सहभाग घेऊन समाजातील विविध प्रश्नांबाबत जनजागृती करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशीच दोन भावंडे २०१० सालापासून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. यंदा अक्ष्य आणि लक्ष्य शाह ही दोन जुळी भावंडे मॅरेथॉनमधून ‘नो स्मोकिंग’चे धडे देणार आहेत.अक्ष्य व लक्ष्य शाह हे जुळे भाऊ आता १२ वर्षांचे आहेत. वयाच्या ६व्या वर्षी म्हणजेच २०१० साली त्यांनी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये (ड्रीम रन) सहभाग घेण्यास सुरुवात केली. धावण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य हे दोघे करीत आहेत. स्पर्धेच्या दिवशी आपल्या वेषभूषेच्या साहाय्याने हे दोघेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात.गेल्या वर्षी त्यांनी ‘किप इंडिया क्लीन’ या विषयावर सर्वांचे लक्ष आपल्या वेषभूषेच्या माध्यमातून वेधले होते. (प्रतिनिधी)
अक्ष्य-लक्ष्य मॅरेथॉनमधून देणार ‘नो स्मोकिंग’चे धडे!
By admin | Updated: January 9, 2017 07:02 IST