Join us

नो रिसॉर्ट नो बार, टेरेस पार्टी हैं इस बार!

By admin | Updated: December 22, 2014 22:56 IST

वेळेचे बंधन, ड्रींक्स बनावट मिळण्याची शक्यता, महागडे दर आणि पोलिसांची भीती या सगळ््याला कंटाळून महानगरातील बहुतांशी तळीरामांनी आपापल्या

ठाणे : वेळेचे बंधन, ड्रींक्स बनावट मिळण्याची शक्यता, महागडे दर आणि पोलिसांची भीती या सगळ््याला कंटाळून महानगरातील बहुतांशी तळीरामांनी आपापल्या इमारतीच्या टेरेसवरच न्यू इयरची पार्टी आयोजिण्याचा फंडा यंदा अनुसरला आहे. त्यामुळे कॅटरर मंडळींची देखील सुगी सुरू झाला आहे.बारमध्ये बसले की, पेग सिस्टमने बिल चार्ज होत असल्याने पार्टी महागडी होते. त्यातही माल असली मिळण्याची गॅरंटी नाही. गर्दी झाली तर पाहिजे तो ब्रॅण्ड मिळत नाही. अनेकदा बारमध्ये जागा ही मिळत नाही. कारण आधीच आरक्षण फुल्ल झालेले असते. या सगळ््या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी बहुसंख्य मध्यमवर्गीय तळीरामांनी टेरेस पार्टीचा फंडा अनुसरला आहे. सोसायटीच्या एका विंगच्या गच्चीवर सगळ््या तळीरामांची पार्टी आणि दुसऱ्या विंगच्या गच्चीवर सांस्कृतिक कार्यक्रम व सुक्या पार्टीचा हंगामा. शेवटी दोन्हीही पार्टीतली मंडळी भोजनासाठी एकत्र! असा हा फंडा आहे. त्यासाठी पीवर माल मिळावा म्हणून कॉन्ट्रीब्यूशन करून आधीच स्टॉक करणे, भोजन पार्टीचा आणि चकन्याचा मेनू याचे कॉट्रॅक्ट कॅटररला देणे असे तंत्र आहे. यामध्ये तळीरामांकडून जी बचत साधली जाते त्यात सोसायटीच्या पार्टीचा बराचसा खर्च निघून जातो, असा या मंडळींचा अनुभव आहे. एकेकाळी बारमध्ये जागा मिळाली नाही म्हणून नाईलाजाने केलेले हा प्रयोग त्याचे फायदे लक्षात आल्यावर सोसायट्या-सोसायट्यात रंगू लागला आहे. डेक अथवा हळू आवाजातील साऊंड सिस्टीम वापरून त्याला आणखी रंगतही आणली जाते. (प्रतिनिधी)