Join us

‘डीपी’त आरक्षणांचा प्रस्ताव नाही - पालिका

By admin | Updated: November 17, 2015 02:38 IST

महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्तावित ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४-२०३४’ याबाबत नामनिर्देशन सर्वेक्षण करण्यात आले आहे, ही माहिती संकेतस्थळावर

मुंबई : महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्तावित ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४-२०३४’ याबाबत नामनिर्देशन सर्वेक्षण करण्यात आले आहे, ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत कोणतीही आरक्षणे प्रस्तावित नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिवाय विकास आराखड्यातील चुकीच्या नामनिर्देशनांची दुरुस्ती प्रस्तावित आहेत. या यादीबाबत नागरिकांची निरीक्षणे मागवण्यात आली आहेत.जहांगीर आर्ट गॅलरीऐवजी चुकून गुरांचे इस्पितळ असे नामनिर्देशन नमूद करण्यात आले होते. ती चूक दुरुस्त करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे इतर चुकांची दुरुस्ती प्रस्तावित आहे. सर्व पुरातन वारसा जतन वास्तू विकास आराखड्यात न दर्शवता, त्यांची यादी अंतिम विकास आराखड्यास जोडण्यात येणार आहे. संबंधित नामनिर्देशन सर्वेक्षण ही तांत्रिक बाब असून, याबाबत गैरसमज पसरणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)