Join us

बॅनरसाठी वाहतूक पोलिसांचा ना हरकत दाखला सक्तीचा

By admin | Updated: December 15, 2014 23:52 IST

पार्किंग आणि फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी झाली नसताना पालिकेने नवे पोस्टर धोरण प्रस्तावित केले आहे

ठाणे : पार्किंग आणि फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी झाली नसताना पालिकेने नवे पोस्टर धोरण प्रस्तावित केले आहे. या धोरणांतर्गत यापुढे शहरात पोस्टर, बॅनर लावण्यापूर्वी वाहतूक शाखा आणि पोलीस विभाग यांचा ना-हरकत दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. त्यानुसार, हे धोरण आता मंजूरीसाठी येत्या महासभेत पटलावर ठेवण्यात आले आहे. तसेच हे बॅनर, पोस्टर केवळ तीनच लावण्याची मुभा दिली जाणार आहे. उत्सव काळात ही मुदत सात दिवसांपर्यंतची असणार आहे. यासाठी पालिका लोखंडी स्ट्रक्चरची उभारणी करणार आहे. या स्ट्रक्चरवरच फलक लावणे बंधनकारक राहणार आहे. या धोरणानुसार तात्पुरत्या स्वरूपात पोस्टर, बॅनर उभारण्यास परवानगीचे अधिकार संबंधित प्रभाग समिती सहायक आायुक्तांना असणार आहेत. तर निर्धारित कालावधीनंतर पोस्टर, बॅनर काढण्याची जबाबदारी संबंधितांची राहणार आहे. तसेच पालिकेने मंजूर केलेल्या दरानुसार याची वसुली केली जाणार आहे. खाजगी जागेवर परवानगी देताना जागामालकाची एनओसी असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)