Join us  

वीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 5:40 AM

वीज बिल भरण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या लांबलचक रांगांना रोखण्यासाठी आता बेस्ट प्रशासनाने शक्कल लढविली आहे. बेस्ट प्रशासनाने आता आपले अ‍ॅप सुरू केले असून, याद्वारे वीज बिल भरता येणार आहे.

मुंबई : वीज बिल भरण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या लांबलचक रांगांना रोखण्यासाठी आता बेस्ट प्रशासनाने शक्कल लढविली आहे. बेस्ट प्रशासनाने आता आपले अ‍ॅप सुरू केले असून, याद्वारे वीज बिल भरता येणार आहे. याद्वारे वेळेत आॅनलाइन वीज बिल भरल्यास सूटही मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची आता लांबलचक रांगांपासून सुटका होणार आहे.बेस्टने ‘मीबेस्ट’ हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपच्या वापरातून ग्राहकांना आता मोबाइलच्या माध्यमातून आपले वीज बिल पाहता येणार असून, त्याचा भरणाही करता येणार आहे. ग्राहकाने वेळेत वीज बिल भरल्यास एकूण रकमेत १.२५ टक्के सूट मिळणार आहे. याद्वारे ग्राहकाला मागील सहा महिन्यांचे वीज बिल पाहता येणार आहे. क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून वीज बिलाचा भरणाही अ‍ॅपमधून करता येणार आहे. त्याबाबतच्या सूचना अ‍ॅपमध्येही ग्राहकांना पाहायला मिळतील. अ‍ॅपच्या माध्यमातून वीजसेवांबाबत तक्रार व सूचनाही नोंदविता येणार आहेत. तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या वीज बिलावरील ग्राहक क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे आहे. या तक्रारीची पोचही ग्राहकांना देण्यात येणार असून, त्याबाबतचा एसएमएस ग्राहकांना पाठविला जाईल. बेस्टशी संबंधित विविध सेवांची माहिती जाणून घेण्यासाठी चौकशी किंवा सुविधांबाबत सूचना करण्याची व्यवस्थाही अ‍ॅपमध्ये करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई