दीपक मोहिते, वसईवसईरोड रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस हा प्रभाग असून या प्रभागात मीठागरे, समर्थ रामदासनगर, संभाजीनगर, औद्योगिक वसाहत व संत जलारामबापूनगर इ. परिसराचा समावेश आहे. सुमारे २० हजार लोकसंख्या असलेला प्रभाग असून आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तरीही पाण्याखालोखाल या प्रभागात प्रामुख्याने कचऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. डंम्पिंग ग्राऊंडसाठी आवश्यक असलेले जमीन सपाटीकरण अजूनही प्रलंबित आहे. दैनंदिन साफसफाईची कामे करण्यात येतात परंतु या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरीता डंम्पिंग ग्राऊंड नसल्यामुळे विल्हेवाटीचे काम मात्र रखडते. त्याचा परिणाम कचरा उचलण्याच्या कामावर जाणवतो.प्रभाग क्र. ६५ ही जागा विरोधीपक्षाने जिंकली व येथून निवडून आलेले विनायक निकम यांची विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. काही प्रमाणात इमारती, झोपडपट्टी व चाळींचा या प्रभागात समावेश आहे. पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून नागरीकांना पुरेसे पाणी मिळत नाही. इतर विकासकामांवर सुमारे १० कोटी रू. खर्च करण्यात आले परंतु पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. या प्रभागातील करदात्यांना आजही पाण्यासाठी एकतर टँकर किंवा बोअरींगवर अवलंबून रहावे लागते. निकम यांच्या म्हणण्यानुसार सत्ताधारी पक्षाकडून विकासकामे करताना दुजाभाव केला जात असल्याने विकासकामे झाली नाहीत.
डम्पिंग ग्राऊंडच नाही
By admin | Updated: February 23, 2015 22:29 IST