Join us

इंग्रजी शिक्षणाबाबत संभ्रम नको

By admin | Updated: January 22, 2015 01:43 IST

देशांमध्ये इंग्रजीला विरोध होण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे लंडन येथील जागतिक शिक्षण परिषदेत केले.

मुंबई : इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजीतून शिक्षण यात फरक करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी गल्लत झाल्यास अनेक देशांमध्ये इंग्रजीला विरोध होण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे लंडन येथील जागतिक शिक्षण परिषदेत केले. अन्य दोन राज्यांतील शिक्षणमंत्र्यांसह तावडे या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले आहेत. जागतिक परिषदेत आयोजित एका परिसंवादात बोलताना तावडे यांनी ही भूमिका मांडली. भारतात इंग्रजी भाषा ही जागतिक उद्योजगत, रोजगार इत्यादींसाठी गरजेची आहे. इतिहास, भूगोल तसेच गणित आणि शास्त्र हे विषय इंग्रजीतून शिकवता येऊ शकतात. पण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र व तत्सम विषय मातृभाषेतूनच शिकवले गेले पाहिजेत, असा जगातील प्रख्यात बालमानसोपचार तज्ज्ञांचा आग्रह आहे, असे तावडे यांनी या वेळी म्हटले. इंग्लिश फॉर बिल्डिंग स्किल डेव्हलपमेंट या विषयावर तासभर चाललेल्या या चर्चासत्रात तावडेंसह अन्य प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. च्इंग्रजीमुळे रोजगाराची संधी मिळणार असली तरी इंग्रजीमुळे प्रतिष्ठा प्राप्त होते, हा भ्रम दूर करण्याची आवश्यकता आहे. जगातील उद्योग भारतात येणार असतील तर इंग्रजी शिकले पाहिजे, हे भारतीयांना कळते. पण त्याचवेळी येथे येणाऱ्या उद्योगांना संबंधित राज्याची किमान भाषा अवगत होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.च्रोजगारासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ इंग्रजी माध्यमातून निर्माण होण्याचे जग स्वागत करेल; पण त्याचवेळी मातृभाषेतून शिक्षण हा निर्धार आणि तशा दृष्टिकोनासाठी सर्वांनी आग्रह धरला पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.