नामदेव मोरे ल्ल नवी मुंबईपालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये व्यवस्थापकपदासाठी सक्षम अधिकारी मिळत नाही. आतापर्यंत फक्त दोनच अधिकाऱ्याने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. एक वर्षापासून शासनाने अधिकाऱ्याचीच नियुक्ती केलेली नसून कार्यशाळाप्रमुखांना परिवहन व्यवस्थापकपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास (एनएमएमटी)अनेक समस्या भेडसावत आहेत. परिवहन सभापतींची वारंवार उचलबांगडी केली जात आहे. त्याचप्रमाणे परिवहन व्यवस्थापक या पदावरही सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात नाही. एनएमएमटी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन वर्षांत पालिका आयुक्तांकडे या विभागाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यांच्यानंतर शासनाने व्यवस्थापकपदावर नियुक्ती केली, परंतु १९९९ पासून २००५ पर्यंत सहा वर्षांमध्ये तब्बल १४ अधिकाऱ्यांवर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. व्यवस्थापकपदावर अधिकाऱ्याची नियुक्ती तीन वर्षांसाठी झाली पाहिजे. परंतु २००१ मध्ये एकाच वर्षात सहा अधिकाऱ्यांची बदली झाली होती. पुढील एक वर्षामध्ये दोन तर २००३ या एक वर्षात चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. २००५ मध्ये व्यवस्थापकपदावर आलेले संजय काटकर २ वर्षे कार्यरत राहिले. त्यांच्यानंतर आलेल्या जितेंद्र पापळकर व जी. सी. मंगळे या दोनच अधिकाऱ्यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मार्च २०१४ मध्ये मंगळे यांची बदली झाल्यापासून अद्याप शासनाने परिवहन व्यवस्थापकपदासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. कार्यशाळा व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. एनएमएमटीमध्ये सक्षम परिवहन व्यवस्थापक नसल्यामुळे त्याचा परिणाम कामकाजावर होत आला आहे. परिवहनसमोरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. उपक्रमाचा तोटा वाढत आहे. प्रशासनाने तोट्यातील मार्ग बंद करून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु सदर प्रयत्न अपुरे पडत आहेत. एनएमएमटीच्या बसेस अनेक वेळा मार्गावर बंद पडतात. बसेस वेळेवर येत नाहीत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एनएमएमटीची वातानुकूलित बससेवा चांगली आहे. परंतु इतर बसेसचा दर्जा सुमारच आहे. यामुळे एनएमएमटीपेक्षा बेस्ट बरी, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत. एनएमएमटी बसेस सद्यस्थितीमध्ये मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरणपर्यंत प्रवाशांना सुविधा देत आहेत. नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन व्यवस्थापकपदावर चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला तर उपक्रमाच्या हितासाठी चांगले निर्णय घेता येतील व त्याची योग्य अंमलबजावणी करता येईल. प्रभारी व्यवस्थापकाकडून उपक्रमाचा गाडा वाहून घेतला जात आहे. अनेक कर्मचारी आमच्या टीमला कॅप्टन नसल्याची खंत व्यक्त करत आहेत. परिवहन सभापतींची वारंवार उचलबांगडी केली जात आहे. प्व्यवस्थापक या पदावरही सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात नाही. त्याचप्रमाणे परिवहन व्यवस्थापक या पदावरही सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात नाही.नावकार्यकाळज. मो. फाटक८ महिनेसुधाकर कुलकर्णी१९ महिनेसुभाषचंद्र भाकरे१ वर्षदत्तात्रय वळवी१८ महिनेश्रीधर बोधे८ महिनेरवी पाटील११ दिवसगौतम गायकवाडअडीच महिनेसुधाकर शिंदेएक महिनासंजीव जाधव११ दिवससुधाकर शिंदे७ दिवसअविनाश हदगल९ महिनेसुधाकर शिंदे८ महिनेनावकार्यकाळसुनील सोनीदीड महिनारमेश उबाळेअडीच महिनेदिलीप गुट्टेसाडेतीन महिनेसुनील चव्हाणएक वर्षशिवराज राणेतीन महिनेसंजय काटकर२ वर्षे ६ महिनेना. ना. आल्हाट४ वर्षेजितेंद्र पापळकरतीन वर्षेडॉ. संजय पत्तीवार११ दिवसजी. सी. मंगळे३ वर्षे ५ महिनेशिरीष आरदवाडमार्च २०१४ पासून आतापर्यंत
एनएमएमटीला मिळेना सक्षम व्यवस्थापक
By admin | Updated: March 26, 2015 00:53 IST