Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे मराठी प्रेम बेगडी

By admin | Updated: November 16, 2014 01:03 IST

मुंबई महापालिकेने मराठीतून कामकाजाची घोषणा केली खरी़ मात्र मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम बेगडी असल्याचे दिसून येत आह़े आजही अनेक विभागांमधील कामकाज, पत्रव्यवहार इंग्रजी भाषेतूनच सुरू आहेत़

मुंबई : मुंबई महापालिकेने मराठीतून कामकाजाची घोषणा केली खरी़ मात्र मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम बेगडी असल्याचे दिसून येत आह़े आजही अनेक विभागांमधील कामकाज, पत्रव्यवहार इंग्रजी भाषेतूनच सुरू आहेत़ याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागानेच पालिकेची कानउघाडणी केली आह़े मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणा:या अधिकारी-कर्मचा:यांवर कारवाईचे संकेतही या विभागाने दिले आहेत़
मुंबई महापालिकेने जून 2क्क्8 पासून 1क्क् टक्के कामकाज मराठीतून करण्याची घोषणा केली़ त्यानुसार पालिकेतील विविध समित्या, महासभेच्या सर्व बैठकांच्या कार्यक्रमपत्रिका, पालिकेचे विविध अजर्, नागरी सुविधा केंद्र येथे मराठीतून कामकाज सुरू झाल़े मात्र मराठी भाषांतर कठीण होत असल्याने अनेक कामचुकार विभागांमध्ये अजूनही मराठीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत़, अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी शासनाकडे केली होती़
याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या कक्ष अधिकारी लीना धुरू यांनी नगरविकास विभागाला पत्र पाठवून यावर उचित कार्यवाही करण्याची सूचना केली आह़े कामकाजात मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणारा विभाग अथवा अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची ताकीदही या कक्षाने दिली आह़े याबाबत आयुक्त सीताराम कुंटे यांनाही पत्र पाठवून मराठीची टाळाटाळ करू नये, अशी समज देण्यात आलेली आह़े (प्रतिनिधी)