Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला महिन्याला मिळणार १४ लाखांचे भाडे

By admin | Updated: June 23, 2015 00:53 IST

कळवा रुग्णालयातील मागील तीन वर्षापासून बंद असलेले मेडीकल स्टोअर आता खऱ्या अर्थाने सुरु होणार असून आता त्याला ठाणे अथवा मुंबईतील

ठाणे : कळवा रुग्णालयातील मागील तीन वर्षापासून बंद असलेले मेडीकल स्टोअर आता खऱ्या अर्थाने सुरु होणार असून आता त्याला ठाणे अथवा मुंबईतील पंचतारांकित रु ग्णालयाला शोभेल एवढे भाडे देणारे ग्राहक ठाणे महापालिकेकडे आले आहेत. वर्षाला तब्बल एक कोटी ६७ लाख रूपये भाडे देण्याची तयारी डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पीटल मेडिकल स्टोअर्सने दर्शविली आहे. त्यामुळे या संस्थेला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकल स्टोअर्स तीन वर्षांसाठी भाड्याने चालविण्यासाठी देण्याचा निर्णय झाला आहे.कळवा येथील शिवाजी रु ग्णालयासाठी डी.वाय. हॉस्पीटल मेडिकल स्टोअर्सने प्रतीमहा १४ लाख १० हजार रु पये देण्याची निविदा सादर केली होती. याच निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. एवढेच नव्हे तर संबधित मेडिकलचे चालक रुग्णांना बारा टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करु न देणार आहेत. या मेडिकल स्टोअर्ससाठी फार्माक्र ॉस इंडियाने चार लाख ४५ हजार, रामेश्वर केमिस्टने तीन लाख ५१ हजार, पारेख मेडिकलने चार लाख ११ हजार, दवा बाजारने सहा लाख ५४ हजार रु पये प्रति महा भाडे देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, या बोलीच्या दुप्पट भाडे देण्याची तयारी डी.वाय.पाटील मेडिकल स्टोअरने दर्शविल्याने आता महापालिकेनेही याला ग्रीन सिग्नल दिला आहे. मुळात ठाणे मनपाकडून रु ग्णांना मोफत औषधे देण्यासाठी वर्षाला दोन कोटींची तरतूद केली जाते. ती मनपाकडून पुरवली जात असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडे देण्याची तयारी खासगी संस्थेने दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.