Join us  

हगणदारीमुक्‍त मुंबईसाठी महापालिका १ हजार १६८ सामुदायिक शौचालये बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 3:09 PM

community toilets : स्वच्छ भारत अभियान

मुंबई : मुंबई महापालिकेने स्‍वच्‍छतेसाठी पायाभूत सुविधा, माहिती-शि‍क्षण-संवाद अंतर्गत कार्यक्रम, क्षमता बांधणी अशा सर्व स्‍तरावर काम केले असून, मुंबईमध्ये अद्यापपर्यंत ७ हजार २१२ शौचालयांमध्ये ८७ हजार ४२२ शौचकुपे वापरात आहेत. तर हगणदारीमुक्‍त मुंबईसाठी मुंबई महापालिका १ हजार १६८ सामुदायिक शौचालये बांधणार आहे.

मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबई शहर हगणदारीमुक्‍त करण्यासाठी वस्‍ती स्‍वच्‍छता कार्यक्रम विभागामार्फत एकूण १ हजार १६८ सामुदायिक शौचालयांमध्ये २२ हजार ७७४ शौचकुपे बांधणे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १३९ सामुदायिक शौचालयांमध्ये २ हजार ८२० शौचकुपे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच ५७७ सामुदायिक शौचालयांमध्ये १३ हजार ९९८ शौचकुपे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिका करत असली तरी हे दावे यापूर्वी केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात फेल गेले आहेत. उघड्यावर शाैच करणा-यांची संख्या काही कमी झाली नाही. उघड्यावर शाैच करणा-यांना कारवाईचा बडगा दाखविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार अशा लाेकांना शंभर रुपये दंड करण्यात आला. क्लिन अप मार्शलमार्फत ही कारवाई करण्यात आली. मात्र मुंबई काही हागणदारीमुक्त झाली नाही.

मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे पालिकेने वारंवार जाहिर केले. मात्र केंद्राच्या स्वच्छता अभियान सर्वेक्षणात मुंबईची रेटिंग घसरतच आली. शिवाय उघड्यावर शाैचविधी उरकणा-यांची संख्या काही कमी झाली नाही. प्रत्यक्ष जनप्रबोधन, पोस्टर, पथनाट्य, वस्तीपातळीवरील बैठका यासारख्या विविध संवाद साधनांचा उपयोग करण्यात आला. मात्र समस्या काही सुटली नाही.

--------------------------

सार्वजनिक शौचालय

सार्वजनिक शौचालयातील ४ पैकी केवळ १ शौचालय स्त्रियांसाठी असे प्रमाण २०१८ मध्ये दिसून आले.१००-४०० पुरुषांसाठी १ आणि १००-२०० महिलांसाठी १ या प्रमाणात शौचालये पाहिजेत.एका सार्वजनिक शौचालयाचा वापर ६९६ पुरुष करतात.एका शौचालयाचा वापर १ हजार ७६९ महिला करतात.

२०१५ : शौचालय आणि...२८ टक्के शौचालये पाईपद्वारे मल:निस्सारणाच्या व्यवस्थेशी जोडलेली होती.७८ टक्के शौचालयांतील नळ जोडणी बाबत सुस्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती.५८ टक्के शौचालयांमध्ये वीज नव्हती.

--------------------------

हे नागरिक झोपडपट्टी/वस्त्यांमध्ये राहात आहेत.अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, विले पार्ले - ४९ टक्केमालाड, मालवणी - ५४ टक्केकांदिवली ५८ - टक्केदेवनार, गोवंडी, मानखुर्द - ३० टक्केभांडुप - ७२ टक्केवांद्रे पश्चिम - ३९ टक्केसायन, किंग सर्कल, दहिसर, कांदिवली, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला - ५० टक्के

--------------------------

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई