Join us
Daily Top 2Weekly Top 5

नितीन सलाग्रे यांच्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:54 IST

न्यायाधीश स्वर्णिता बा. महाले यांनी शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नितीन बंडोपंत सलाग्रे यांना प्रभाग क्रमांक ७६ चे नगरसेवक म्हणून घोषित केले.

मनोहर कुंभेजकर मुंबई : लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधीश स्वर्णिता बा. महाले यांनी शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नितीन बंडोपंत सलाग्रे यांना प्रभाग क्रमांक ७६ चे नगरसेवक म्हणून घोषित केले. महापालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सलाग्रे यांच्या नगरसेवकपदाची घोषणा करणार आहेत.७६ हा प्रभाग इतर मागासवर्गीय म्हणून राखीव होता. येथून फेब्रुवारी २०१७ ला केशरबेन मुरजी पटेल या निवडून आल्या होत्या. त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वी फेटाळले होते.