Join us

नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वासाठी निवड

By admin | Updated: August 4, 2016 20:59 IST

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यात्वासाठी निवड करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. ०४ - रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यात्वासाठी निवड करण्यात आली आहे. रिओ दी जानेइरो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत नीता अंबानी यांची सदस्यात्वासाठी निवड केली. या समितीचे सदस्यत्व मिळविणा-या नीती अंबानी पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. आता वयाच्या ७०व्या वर्षापर्यंत त्यांचे सदस्यत्व अबाधित राहणार आहे.गेल्या जून महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वासाठी नीता अंबानी यांना नामांकन मिळाले होते.