Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्वद हजारांची चोरी

By admin | Updated: October 22, 2014 22:26 IST

खारघर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर १३ महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पनवेल : खारघर सेक्टर १५, घरकूल येथे राहणारे अशोक खरात हे मागील वर्षी मार्च महिन्यात आपल्या कुटुंबासह गावी गेले असता त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण नव्वद हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. खारघर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर १३ महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.खारघर पोलिसांनी अशोक खरात यांचा भाचा असलेल्या सचिन कांबळे याला अटक केली आहे. तो चेंबूर येथील रहिवासी असून बनावट चावीने दरवाजाचे कुलूप तोडून ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. (वार्ताहर)