Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा रात्रकालीन मेगाब्लॉक

By admin | Updated: May 26, 2014 02:21 IST

ओव्हरहेड वायर, सिग्नल व रेल्वेमार्गाच्या मेन्टनन्ससाठी पश्चिम रेल्वेमार्गावर २७ मे, मध्य रेल्वेमार्गावर २६ मे व ३० मे रोजी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

मुंबई : ओव्हरहेड वायर, सिग्नल व रेल्वेमार्गाच्या मेन्टनन्ससाठी पश्चिम रेल्वेमार्गावर २७ मे, मध्य रेल्वेमार्गावर २६ मे व ३० मे रोजी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेने तीन लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प. रेल्वे मार्गावर बोरीवली ते भाईंदर स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन धीम्या गतीच्या मार्गावर मध्यरात्री १.०५ ते पहाटे ४.०५ वाजपेर्यंत ब्लॉक असणार आहे.