Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 05:25 IST

माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान शनिवार-रविवारच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेने जम्बो ब्लॉक घोषित केला आहे. शनिवार रात्री १२ वाजल्यापासून ते रविवार ५ वाजेपर्यंत माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान शनिवार-रविवारच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेने जम्बो ब्लॉक घोषित केला आहे. शनिवार रात्री १२ वाजल्यापासून ते रविवार ५ वाजेपर्यंत माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या सांताकु्रझ ते चर्चगेट स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. सुट्ट्यांचा काळ असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने गावी जाण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारचा दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.