मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावर आणि रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत डाउन धिम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान वसई रोड ते विरार दरम्यानची अप आणि डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाउन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर आज घेण्यात येणार रात्रकालीन ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 06:19 IST