Join us

लाखोंचा गंडा घालणारा नायजेरियन गजाआड

By admin | Updated: October 17, 2014 01:04 IST

लाखो रुपयांचा गंडा घालणा:या नायजेरियन तरुणाला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने नालासोपा:यातून अटक केली. चिमा एमॅन्युअल उर्फ पिटर बकींगहॅम असे त्याचे नाव आहे.

मुंबई : यूकेतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये नोकरीची जाहिरात देऊन देशभरातील अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणा:या नायजेरियन तरुणाला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने नालासोपा:यातून अटक केली. चिमा एमॅन्युअल उर्फ पिटर बकींगहॅम असे त्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, चिमा ओएलएक्स वेबसाईटवर यूकेतील प्रसिद्ध हॉटेलसह अनेक व्यापारी संस्थांमध्ये चांगल्या नोक:या मिळतील, अशी जाहिरात देई. ही जाहिरात पाहून देशभरातल्या अनेक तरुणांनी त्याला संपर्क साधला. त्या प्रत्येकाकडून चिमाने स्वपरिचयपत्र मागवून घेतले. त्यांच्या नावे हॉटेल्स, व्यापारी संस्थांच्या बनावट लेटरहेडवर ऑफर लेटर धाडली. तसेच देशभरात उघडलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. तरुणांनी भरलेले पैसे चिमाने काढले. मात्र पुढे त्याचा संपर्क खुंटल्याने काही तरुणांनी चौकशी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हे तरुण पोलीस ठाण्यात धडकले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
आर्थिक गुन्हे शाखेच्या युनिट 4चे एपीआय जयवंत दरेकर, संजय खेडेकर, सोमनाथ घुगे, प्रवीण भगत, निरीक्षक लोटलीकर, आठवले आणि पथकाने शिताफीने तपास करून 
चिमाचा नालासोपा:याचा ठावठिकाणा शोधून काढला. 13 ऑक्टोबरला त्याला नालासोपा:यातील आचोले तलाव परिसरातून अटक करण्यात आली. चिमाने आजवर अनेक तरुणांना 16 लाख रुपयांचा गंडा घातल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)