मुंबई : 50 शेअर असणारा राष्ट्रीय निर्देशांक निफ्टी सोमवारी उच्चंकावर बंद झाला असून, या निर्देशांकाने 8344 अंकांवर ङोप घेतली; पण 3क् शेअर्सचा मुंबई सेन्सेक्स मात्र उच्चंकावरून घसरला आहे. दिवसभरात गाठलेला उच्चंक मुंबई निर्देशांकाला टिकवता आला नाही. 28,क्27.96 अंकांची ङोप घेणा:या सेन्सेक्सने 28 हजारांची पत ओलांडली; पण सकाळी गाठलेल्या उच्चंकावरून घसरण झाली.
दलालांच्या मते गुंतवणूकदारांनी नफेखोरीसाठी शेअर्स विकून नफा पदरात पाडला. बँकरेट कमी होण्याची शक्यता मावळल्याने सेन्सेक्स उच्चंक नोंदवून खाली उतरला.
रिझव्र्ह बँकेच्या उपगव्हर्नरनी येत्या पतधोरणाचे (2 डिसेंबर) संकेत देताना व्याजकपातीची शक्यता नसल्याचे सांगितले. त्याची प्रतिक्रिया म्हणून शेअरबाजारातील उलथापालथ झाली; पण नंतर सेन्सेक्स सावरला व दिवसभराचे नुकसान भरून निघाले; पण सेन्सेक्समध्ये फारशी भर न पडता तो सपाट झाला असे रेलिगेअर सिक्युरीटीजचे अध्यक्ष जयंत मांगलिक म्हणाले. दरम्यान, शेअरबाजाराच्या पूरक माहितीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी 2,537.13 रुचे शेअर्स घेतले आहेत. आयटीसीचे शेअर सर्वाधिक नफ्यात असून, त्यांचा नफा 4.27 टक्के नोंदला गेला आहे.
4सकाळी मजबूत असणा:या सेन्सेक्सने 28,क्27.96 ची पातळी गाठली व 5 नोव्हेंबरचा 28,क्1क्.39 चा उच्चंक मोडला; पण नंतर अस्थिर झालेल्या बाजारात वर-खाली होत सेन्सेक्स 27,764.75 अंकांर्पयत खाली आला. अखेर 27,874.73 वर बंद झाला. हा आकडा शुक्रवारच्या बंदपेक्षा 6.1क् अंकांनी जास्त आहे.
45क् शेअरचा निफ्टी 7.25 अंकांनी वाढला असून, ही वाढ क्.क्9 टक्के आहे. 8,344.25 वर बंद झालेल्या निफ्टी निर्देशांकाची ही वाढ आतार्पयत सर्वोच्च आहे.