Join us

पुढच्या वर्षी ५००० जागांचे आॅनलाईन प्रवेश

By admin | Updated: August 6, 2015 02:02 IST

पुढच्या वर्षी अकरावी प्रवेशाच्या पाच हजार जागा आॅनलाईन प्रक्रियेने भरण्याचा विचार असल्याचे शिक्षण विभागाने बुधवारी उच्च न्यायालयाला सांगितले.

मुंबई : पुढच्या वर्षी अकरावी प्रवेशाच्या पाच हजार जागा आॅनलाईन प्रक्रियेने भरण्याचा विचार असल्याचे शिक्षण विभागाने बुधवारी उच्च न्यायालयाला सांगितले.नव्या शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेशाच्या जागा कशा भरणार, याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने गेल्या महिन्यात शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार शिक्षण संचालक, उपसंचालक यांची बैठक झाली. या बैठकीत वरील पर्यायाचा विचार करण्यात आला. अकरावीच्या पाच हजार जागा आॅनलाईन पद्धतीने भरल्यानंतरच आॅफलाईनचा विचार करायला हवा, यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे अतिरिक्त सरकारी वकील दिनेश खैरे यांनी न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठाला सांगितले.आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत दोष असून ही पद्धतच बदलावी, अशी मागणी करणारी याचिका पुणे येथील वैशाली बाफना यांनी अ‍ॅड. सुगंध देशमुख यांच्या मार्फत केली आहे.