Join us  

पुढच्या वर्षी लाडक्या बाप्पाचे ११ दिवस आधी होणार आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 10:11 AM

गेल्या दहा दिवसांपासून बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर  'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणत आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

मुंबई: गेल्या दहा दिवसांपासून बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर  'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणत आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मात्र पुढच्या वर्षी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन 11 दिवस लवकर होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

घरगुती गणपतींसोबत विविध मंडळांच्या गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून बाप्पाच्या प्रेमात रमलेले भक्त गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी शनिवार, २२ ऑगस्टला असल्याने 11 दिवस लवकर बाप्पाचे आगमन होणार आहे.

त्याचप्रमाणे बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच बाप्पाचे विसर्जन करताना खोल पाण्यात जाऊ नये, तसेच पोलिस, जीवरक्षक यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :गणेशोत्सवगणपती