मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाला आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. परंतु कोरोनाचे मोठे संकट सगळीकडे घोंगावत होते तेव्हा कशाचीही पर्वा न करता घरोघरी जाऊन वर्तमानपत्र वाटण्याचे काम वृत्तपत्र विक्रेत्यांनी चोखपणे केले. या वृत्तपत्र विक्रेत्यांचा घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ व घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता सेना यांनी संयुक्तपणे नुकताच ‘कोरोना योद्धे’ म्हणून गौरव केला. मकरसंक्रांतीचे औचित्य साधून तीळगूळ, मास्क आणि प्रमाणपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रकाश वाणी, दीपक गवळी, प्रकाश गिलबिले, नितीन रेनुसे, नितीन गंभीर, सचिन भांगे, किशोर येवले, दीपक पवार, अंकुश खरात, अशोक शिंदे, युनुस पटेल, दिनकर येवले, विजय कोठवदे, अशोक हांडे, रवी मोरणकर, संतोष वाकचोरे, प्रदीप अमृतकर आदी उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेतेही कोरोना योद्धेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:08 IST