Join us

ईस्टर्न...दोन सारांशसाठीच्या बातम्या...

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

दोन सारांशसाठीच्या बातम्या...

दोन सारांशसाठीच्या बातम्या...
.......................................
मुलुंडमध्ये दिव्यांंखाली अंधार
मुलुंड: पश्चिमेकडील अशोक नगर परिसरात दिव्यांंचे खांब लावून महिने उलटलेत. मात्र अद्यापही ते बंद अवस्थेत असल्याने परिसरात अंधाराची समस्या कायम आहे. यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. हे दिवे लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
..................................
दुचाकीच्या धडकेत हवालदार जखमी
सायन: नाकाबदीच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना दुचाकीच्या धडकेत पोलीस हवालदार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायन येथे घडली. याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला सायन पोलिसांनी अटक केली आहे.
किशोर शिवलिंग तोडकर (५३) असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव असून ते जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी सायन येथील डॉ.बी.ए. रोड येथे नाकाबंदीसाठी कर्तव्य बजावत होते. त्याचदरम्यान आरोपी तरुण यामहा एफ झेड या दुचाकीवरुन भरधाव वेगाने जात असल्याने तोडकर यांनी त्याला अडाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणाने दुचाकी न थांबवता तोडकर यांना धडक देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तोडकर गंभीर झाले असून जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.