मुंबई : भावाच्या निधनाची बातमी वृत्तपत्रतून कळल्याचा प्रकार नुकताच घडला. नांदेड येथील विशाल बनसोडे यांना आपला भाऊ दर्शन याने आत्महत्या केल्याचे वृत्तपत्रतून कळले. दर्शनने आईच्या आजारपणाच्या चिंतेमुळे आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.
‘केईएम रुग्णालयात अनोखळी मृतदेह सापडला, हा मृतदेह कोणाचा याविषयी पोलीस चौकशी करत आहेत, अशा बातम्या 23 सप्टेंबरला आल्या. तो मृतदेह माङया भावाचा आहे, हे मला वृत्तपत्रंतून कळले,’ असे विशाल बनसोडे यांनी सांगितले.
22 सप्टेंबर रोजी परेलच्या केईएम रुग्णालयामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. विशाल यांच्या आईला दोन महिन्यांपूर्वी केईएम रुग्णालयामध्ये दाखल केले होते. तिला अर्धागवायूचा त्रस आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णालयात उपचार होत असल्यामुळे तिला येथे आणले. दोन महिन्यांपासून विशाल मुंबईतच होते. ‘गेल्या आठवडय़ात दर्शन आईला बघण्यासाठी केईएममध्ये आला होता, मात्र शनिवारी तो अचानक गायब झाला. वर्तमानपत्रत बातमी वाचल्यावर आम्ही पाहायला गेलो, तेव्हा दर्शनने आत्महत्या केल्याचे कळले, असे विशाल यांनी सांगितले.