Join us  

ओशिवरा मॅटर्निटी होमच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:25 PM

ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये रुग्णालयाच्या हलगर्जीपणा आणि अपुऱ्या स्टाफमुळे नुकताच एका नवजात बालकाला जीव गमवावा लागला आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई- ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये रुग्णालयाच्या हलगर्जीपणा आणि अपुऱ्या स्टाफमुळे नुकताच एका नवजात बालकाला जीव गमवावा लागला आहे. रुग्णाचे नातेवाईक मोहम्मद आरिफ यांनी या सगळ्या प्रकाराला मॅटर्निटी होमच्या भोंगळ कारभाराला जबाबदार धरले आहे. आदर्शनगर, ओशिवरा येथे राहणाऱ्या ३० वर्षीय निखत मलिक यांचे नाव या प्रसूतिगृहात नोंदविण्यात आले होते.निखत यांची नियमित आरोग्य तपासणी होत होती आणि त्यात बाळ सुदृढ असल्याचे दिसत होते."१० फेब्रुवारीला निखतची जेव्हा तपासणी झाली तेव्हा तिला सांगण्यात आलेला की १-२ दिवसांत डिलिव्हरी होईल. १२ फेब्रुवारीला निखतला प्रसूती वेदनांसह प्रचंड रक्तप्रवाह होऊ लागला, त्यामुळे आम्ही तिला ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये ऍडमिट केलं. इथे पोहोचल्यानंतर आम्हाला तब्बल २० मिनिटानंतर डॉक्टर पोहोचले. तोपर्यंत बाळाची पल्स रेट कमी झालेली. आम्हाला सांगण्यात आले की रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ओशिवरा मॅटर्निटी होम मध्ये कुठल्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसते या सगळ्यामध्ये आमचा दीड तास वाया गेला आणि निखतच्या शरीरातून पुष्कळ रक्त वाहून गेलेले. त्यांनतर १० मिनिटानंतर आलेल्या अँब्युलन्समध्ये डॉक्टरही नव्हते. त्यांनतर तिला कूपरमध्ये हलवण्यात आले जिथे पशन करून बाळाला बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत बाळ मृत्युमुखी पडलेले होते" असे रुग्णाचे नातेवाईक आरिफ यांनी सांगितले.विधिमंडळ महिला हक्क आणि बाल कल्याण समितीने मुंबईतील अनेक हॉस्पिटल्सना नुकतीच भेट दिलेली होती.वर्सोव्याच्या भाजपाच्या स्थानिक आमदार आणि या समितीच्या अध्यक्ष डॉ. भारती लव्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, " वर्सोवा येथील आर्थिकदृट्या गरीब महिलांना 35 बेडचे ओशिवरा मॅटर्निटी होमजवळ आहे. ओशिवरा मॅटर्निटी होममधील जनरल ओपीडी आणि नर्सिंग होम अद्ययावत करावे तसेच येथे पुरेसा स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मी महानगरपालिकेकडे गेली 3 वर्षे सातत्याने करत आहे.या प्रकरणी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सुद्धा दाद मागितली आहे. ओशिवरा मॅटर्निटी होमच्या भोंगळ कारभाराविरोधात आपण येत्या विधानसभेत लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान यासंदर्भात पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही दुजोरा दिला नाही. दरम्यान परिमंडळ 4 चे उपकार्यकरी अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी निश्चित चौकशी केली जाईल आणि जर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.