पेण : पेणच्या खारेपाटाला भेडसावणारा भीषण पाणीटंचाईचा प्रश्न नव्या वर्षात मार्गी लागणार आहे. हेटवणे-शहापाडा ही दोन धरणे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेत बांधली जाणार आहेत. गेली पंधरा वर्षे या दोन धरणांचा एकमेकास जोडण्याचा दुरावा संपणार आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून या योजनेसाठी तब्बल २६ कोटींचा निधी मिळण्याकामी आमदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांतून रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी पुढाकाराने १४ ग्रामपंचायतींनी याकामी एकत्रित पुढाकार घेतला आहे. पेणच्या उत्तर शहापाडा पाणी पुरवठा योजनेला संजीवनी मिळून खारेपाटातील पाणीटंचाई दूर होण्याचा नवा संकल्प आहे.शहापाडा धरणाची पाणी क्षमता वर्षातील ३६५ दिवसांपैकी फक्त १२८ दिवसांचीच आहे. त्यानंतर मात्र पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. २००४ साली हेटवणे सिडकोच्या मुख्य जलवाहिनीवरून मार्चनंतर वाशी खारेपाटाला पाणी पुरवठा करण्याकामी ८० लाखांची पूरक योजना घेण्यात आली, मात्र ती योजना होवूनदेखील खारेपाटाची तहान भागू शकली नाही. शहापाडा उत्तर व दक्षिण पाणी पुरवठा योजनेची १६ गावे, १२ वाड्या अशी एकूण २८ गावे, ३६ वाड्यांना सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. हेटवणे ते शहापाडा धरण हे १९ कि.मी. अंतर राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिनी टाकून हेटवण्याचे पाणी शहापाडा धरणात सोडण्यात येणार आहे. (वार्ताहर)च्योजनेत वाशी, वढाव, दिव, बोर्झे, कणे, उंबर्डे, कोप्रोली, उचेडे, मळेघर, कांदळे, वडखळ, बोरी, शिर्क व मसद या ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. च्महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने योजनेचा आराखडा तयार केला असून मुख्य जलवाहिनीसह शहापाडा योजनेतील जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाची व्यवस्था आहे.च्योजनेंतर्गत हेटवणे धरणातील पाणी शहापाडा धरणात संकलित होवून शुध्दीकरणानंतर वितरीत होईल.
नव्या वर्षाची नवलाई
By admin | Updated: December 31, 2014 22:15 IST