Join us  

नव वर्षाचे स्वागत लंडनमध्ये मराठमोळ्या ‘ढोल-ताशा’च्या गजराने होणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 5:00 PM

ढोल बिट्समध्ये ३ वर्षांपासून ५० वर्षापर्यंतच्या सदस्यांचा समावेश

मुंबई : लंडन येथे १ जानेवारी २०२० रोजी होणा-या ‘न्यु इयर डे परेड २०२०’ मध्ये ‘एमएमएल ढोल बिट युके’ आपली कला सादर करणार आहे. लंडन येथे होणा-या परेडला ३७ वर्षांची परंपरा असून, यावर्षी प्रथमत:च महाराष्ट्रीयन ढोल-ताशाला नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा मान मिळाला आहे.

एमएमएल ढोल बिट्सचे प्रत्येकी ४० संघ असून, युके येथे लंडन स्कूल ऑफ ढोलचे २०० पंजाबी ढोल प्लेअर्स आणि महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती आणि इंग्लश बिट्सचा यात एकत्रित समावेश आहे. एमएमएल ढोल बिट्समध्ये ३ वर्षांपासून ५० वर्षापर्यंतच्या सदस्यांचा समावेश असून, वर्षभरात ३० ते ३५ कार्यक्रमांत यांचा सहभाग असतो. विशेषत: यात गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमांचा समावेश असून, यावर्षी या ढोल-ताशास थेट साता समुद्रापार म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडनमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.

एमएमएल ढोल बिट्स युके पथकाचे ज्ञानेश दौडखाने आणि मोनिष पवार हे पथकाचे नेतृत्त्व कार्यक्रमात करणारा असून, पथकाचा कार्यक्रमातील सहभाग लक्षवेधी असणार आहे. दरम्यान, ही परेड सेंट्रल लंडन येथील पिकॅडिले सर्कस, ट्रफ्लगर स्केअर, ड्राविंग स्ट्रीट ते वेस्टमिनिस्टर लँडमार्क येथे होणार आहे.

टॅग्स :लंडननववर्ष