Join us  

अनोखा सॅल्यूट! नव्यानं शोध लागलेल्या कोळीच्या प्रजातीला २६/११ हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:35 AM

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जीवंत पकडून देण्यात जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचं नाव एका नव्यानं शोध लागलेल्या कोळीला देण्यात आलं आहे.

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जीवंत पकडून देण्यात जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचं नाव एका नव्यानं शोध लागलेल्या कोळीला देण्यात आलं आहे. कोळींच्या नव्या प्रजातींचा शोध घेणाऱ्या टीमनं एका जबरदस्त आणि दुर्मीळ कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे. या प्रजातीला 'आयसियस तुकारामी' (Icius tukarami) असं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (New spider species, Icius Tukarami, named after 26/11 braveheart cop Tukaram Omble )

महाराष्ट्रात कोळीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध घेण्यात आला. यातील एकाला genera Phintella असं नाव देण्यात आलंय. तर दुसऱ्या प्रजातीला Icius tukarami असं नाव जाहीर केलं गेलं आहे. कोळी संशोधकानं याबाबतची माहिती देताना शहीद तुकाराम ओंबळेंचा उल्लेख करुन त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून कोळीच्या नव्या प्रजातीला त्यांचं नाव देणं अभिमानास्पद ठरेल असं म्हटलं आहे. 

"महाराष्ट्रात दोन नव्या कोळीच्या प्रजातींचा शोध लागला आहे. यातील एकाला genera Phintella तर दुसऱ्या कोळीला मुंबईवरील २६/११ हल्ल्यात दहशतवादी कसाबला जीवंत पकडून देण्यासाठी स्वत:वर २३ गोळ्या झेललेल्या शहदी तुकाराम ओंबळे यांचं नाव देण्यात आलं आहे. Icius tukarami या नावानं हा कोळी महाराष्ट्रात ओळखला जाणार आहे", असं ट्विट ध्रूव प्रजापती या कोळींवर संशोधन करणाऱ्या तरुणानं म्हटलं आहे. 

'त्या' रात्री काय घडलं होतं?२६/११ हल्ल्यात मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ अजमल कसाब आणि इस्माइल खान यांनी बेछुट गोळीबाराला सुरुवात केली होती. त्यानंतर ते कामा हॉस्पीटलच्या दिशेनं पळाले होते. दोघंही हॉस्पीटलच्या मागच्या दारानं आत येण्याचा प्रयत्न करत होते. पण हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांनी सर्व दरवाजे आतून बंद करुन घेतले होते. यानंतर हॉस्पीटलजवळ कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर या दोघांनी हल्ला चढवला होता. यात सहा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचाही समावेश होता. 

कसाब आणि इस्माईल खान यांनी यानंतर गिरगाव चौपाटीकडे पोलिसांचीच गाडी घेऊन पळाले होते. यावेळी पोलिसांनी नाकाबंदी करून दहशतवाद्यांना अडवलं होतं. यात तुकाराम ओंबळे धाडस दाखवून अजमल कसाबसमोर निधड्या छातीनं उभे राहिले होते. यावेळी कसाबला जीवंत पकडता यावं यासाठी ओंबळे यांनी कसाबला धरलं आणि तो झाडत असलेल्या गोळ्या स्वत:वर झेलल्या. यात जवळपास २३ गोळ्या ओंबळे यांनी झेलल्या. ओंबळेंच्या वीरतेमुळे अजमल कसाब याला जीवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. तुकाराम ओंबळेंच्या या धाडसी कार्याची त्यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करुन दखल घेण्यात आली होती. 

टॅग्स :26/11 दहशतवादी हल्लामुंबईमुंबई बॉम्बस्फोटमुंबई पोलीस