Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांना नवीन स्पीड गन

By admin | Updated: June 19, 2015 01:32 IST

वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक पद्धतीच्या पाच स्पीड गन दाखल झाल्या आहेत. पामबीच मार्गावर गुरुवारी वेगमर्यादा ओलांडणाऱ्या

नवी मुंबई : वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक पद्धतीच्या पाच स्पीड गन दाखल झाल्या आहेत. पामबीच मार्गावर गुरुवारी वेगमर्यादा ओलांडणाऱ्या तब्बल १७ वाहनधारकांवर या स्पीड गनचा वापर करीत कारवाई करण्यात आली.रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मद्यपान करून वाहने चालवू नयेत, वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. शहरात सायन-पनवेल महामार्ग, पामबीच व ठाणे-बेलापूर मार्ग हे तीन प्रमुख मार्ग आहेत. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वाहने अतिवेगाने चालविली जातात त्यामुळे अनेकदा अपघाताला आमंत्रण मिळते. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या स्पीड गन आणल्या आहेत. नियमानुसार महामार्गावर ताशी ८0 किमीपेक्षा अधिक वेगाने वाहने चालविणे हा गुन्हा आहे. असे असले तरी या नियमाला बगल देत अनेक वाहनधारक शहरातील अंतर्गत रस्त्यांवरसुध्दा ही वेगमर्यादा अनेक चालक ओलांडतात. नवीन स्पीड गनमुळे वाहनांच्या वेगाला ब्रेक लागेल, असा विश्वास वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आजच्या पहिल्याच दिवशी पामबीच मार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या १७ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई अधिक गतिमान करण्यात येणार आहे, अशी माहिती साळवे यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)