Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीत नवीन स्कायवॉक

By admin | Updated: March 12, 2015 01:07 IST

चाकरमान्यांच्या वाढत्या रहदारीमुळे वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेऊन ठाणे- बेलापूर मार्गावर ऐरोली रेल्वे स्थानकासमोर

नवी मुंबई : चाकरमान्यांच्या वाढत्या रहदारीमुळे वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेऊन ठाणे- बेलापूर मार्गावर ऐरोली रेल्वे स्थानकासमोर स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. एमआयडीसी प्रशासनाने या कामाच्या निविदा काढल्या असून ही प्रक्रिया पूर्ण होताच साधारण पंधरा ते वीस दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. ऐरोली एमआयडीसीत अनेक आयटी कंपन्या आहेत. तेथील मार्गावरून दिवसाला साधारण ३० ते ३५ हजार लोक ये-जा करतात. ३० हजारांपेक्षा अधिक वाहनांचा दैनंदिन वावर असतो. त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीची उद्भवते. त्यामुळेच स्कायवॉक उभारण्याची विनंती वाहतूक विभागाच्यावतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. प्रशासनाने चाचपणीही सुरू केली होती. तसा प्रस्तावही एमआयडीसीला देण्यात आला होता. मात्र एमआयडीसीने या स्वत:च स्कायवॉक उभारण्याची तयारी दर्शविली आहे. निविदाही काढण्यात आल्या असून १५ ते २० दिवसांत स्कायवॉक उभारणीला सुरुवात होईल, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)