Join us

नॅशनल पार्कमध्ये आता बिबट्यांना नवा निवारा

By admin | Updated: January 6, 2015 00:50 IST

बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानातील बिबट्यांना नवीन वर्षात नवीन निवारा मिळणार आहे.

जयाज्योती पेडणेकर ल्ल मुंबईबोरीवलीच्या संजय गांधी उद्यानातील बिबट्यांना नवीन वर्षात नवीन निवारा मिळणार आहे. सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नगर जिल्ह्यातून २००७ साली रेस्क्यू करून आणलेले १४ बिबटे आहेत. या बिबट्यांना मुक्तपणे मोकळ््या वातावरणात विहार करता यावा, याकरिता ऐसपैस असा नवीन निवारा बांधण्यात आला असून याचे काम अंतिम टप्प्यात आहे. २००८ साली केंद्रीय झू आॅथोरीटीने राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा त्यांच्या पाहणीत रेस्क्यू करुन आणलेले बिबटे नैसर्गिक वातावरणात मुक्तविहार करु शकत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी बिबट्यांना मोकळ््या वातावरणात मुक्तपणे व स्वच्छंदी विहार करता येण्यासाठी नवीन निवारा बांधण्याकरिता निधी दिला. तो निधी उद्यानाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सुपूर्द केला. २००८ नंतर निवारा बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. २०१५ साली नवीन वर्षात हे काम अंतिम टप्प्यात आले असून उद्यानांतील १४ बिबट्यांना या नवीन निवाऱ्यात लवकरच स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या निवाऱ्याला ह्यआॅरफन केज मॅपकोह्ण हे नाव देण्यात येणार आहे. नव्या निवाऱ्यात काय असेल?नॅशनल पार्कमध्ये एकूण २४ नवे पिंजरे आणण्यात आले आहेत. एका ओळीत प्रत्येकी ८ पिंजरे आहेत. बिबट्यांना मुक्त संचार करता यावा त्यात ते मोकळ््या वातावरणात मातीशी, खेळण्यांसोबत खेळू शकतील असे दोन सेफ्टी झोन उभारण्यात आले आहेत. तसेच दाराच्या प्रवेश द्वारातच तीन दोन ते तीन फूट उंचीची कृत्रिम बैठक व्यवस्था देखील करण्यात आली आहे. बिबट्यांच्या देखरेखीकरिता खास सुरक्षा चौकी बांधण्यात आली आहे.