Join us
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाकडून नवअभिनेत्रीचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:36 IST

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फिल्मसिटीत काम करीत असलेल्या एका नवोदित अभिनेत्रीचा बलात्कार करणा-या तरुणाला गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली

मुंबई : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फिल्मसिटीत काम करीत असलेल्या एका नवोदित अभिनेत्रीचा बलात्कार करणा-या तरुणाला गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. प्रदीप तिवारी उर्फ चिंटू (वय २७, रा. रावळपाडा) असे त्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. १२ जानेवारीला त्याने हे कृत्य केले होते.फिल्मसिटीमध्ये काम करीत असलेल्या एका तरुणीने १२ जानेवारीला मध्यरात्री २च्या सुमारास दहिसर चेकनाक्याजवळून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मोटारसायकलवरून जात असलेल्या अज्ञाताकडून लिफ्ट घेतली. मात्र त्याने तिला निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केला.घटनेच्या काही दिवसांनंतर दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिने सांगितलेल्या वर्णनावरून गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष १२चे प्रभारी महेश निवतकर आणि त्यांच्या पथकाने अशोकवनच्या रिक्षा स्टँडजवळून चिंटूला पकडून दहिसर पोलिसांच्या ताब्यात दिले.