Join us

नवे पार्किग दर नोव्हेंबरपासून

By admin | Updated: September 19, 2014 01:58 IST

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पार्किगचे नवीन धोरण लटकण्याची शक्यता आह़े तरीही नोव्हेंबर महिन्यापासून पार्किगचे सुधारित दुप्पट व तीनपट दर लागू होणार आहेत़

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पार्किगचे नवीन धोरण लटकण्याची शक्यता आह़े तरीही नोव्हेंबर महिन्यापासून पार्किगचे सुधारित दुप्पट व तीनपट दर लागू होणार आहेत़ याचा सर्वाधिक फटका मराठी माणसाला बसणार आह़े हे एक प्रकारे मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आह़े
नोव्हेंबर 2क्13मध्ये पार्किगच्या दराची मुदत संपली़ त्यामुळे सुधारित दर अंमलात आणतानाच मुंबईतील पार्किगला शिस्त लावण्यासाठी पालिकेने धोरण आणल़े त्यानुसार निवासी सोसायटीबाहेरील पार्किग, रात्रीचे पार्किग, रस्त्यावरील पार्किगवर र्निबध आल़े पार्किगचे सुधारित दरही तीनपट वाढविण्यात आल़े मात्र निवडणुकीचे वर्ष असल्याने हे धोरण रेंगाळल़े
नवीन दर नोव्हेंबरपासून लागू करणो आवश्यक असल्याने प्रशासनाने पार्किगचे धोरण पालिकेच्या महासभेपुढे आणले आह़े विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या धोरणावर निर्णय होणो शक्य नाही़ 
मात्र नोव्हेंबरपासून जुन्या चाळी व इमारती तसेच झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना रस्त्यावरील पार्किगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत, 
असा आक्षेप विरोधी पक्षनेते 
देवेंद्र आंबेरकर यांनी घेतला 
आह़े (प्रतिनिधी)
 
वाहतुकीत अडथळा
च्मुंबईतील दीड कोटी जनता बस व रेल्वेतून दररोज प्रवास करीत असत़े उर्वरित 15 ते 2क् टक्के लोक खाजगी वाहनांतून प्रवास करतात़ अशा श्रीमंतांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहिल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो़ 
च्त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजू अडविणा:या या श्रीमंतांकडून पार्किग शुल्क वसूल करण्यासाठी पालिकेने हे धोरण आणले असल्याचा दावा प्रशासनाने केला आह़े मात्र लालबाग, परळ, करी रोड, चिंचपोकळी येथील चाळी व जुन्या इमारतींमध्ये राहणा:या मराठी माणसाला याचा फटका बसणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आह़े
 
फोर्ट, हुतात्मा चौक, हॉर्निमोन सर्कल, बॉम्बे हॉस्पिटल लेन, चर्चगेट, जहांगीर आर्ट गॅलरी, नरिमन पॉइंट, ताजमहल हॉटेल, दादर टी़टी़, जी़बी़ मार्ग, गोरेगाव स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी पार्किगसाठी प्रत्येक तासाला 6क् रुपय़े
रिगल सिनेमा, पोलीस जिमखाना, नेपयन्सी रोड, फेमस स्टुडिओ लेन, बी़जी़ खेर मार्ग, न्यू प्रभादेवी रोड या ठिकाणी पार्किगसाठी 4क् रुपय़े 
बी़डी़ माझदा अपार्टमेंट, घाटकोपर, माहुल रोड शॉपर्स स्टॉपजवळ आदी ठिकाणी 2क् रुपये ताशी पार्किगचे दर असणार आहेत.
 
पार्किगचे धोरण कशासाठी? : आजच्या घडीला पार्किगसाठी तासाला 15 ते 2क् रुपये आकारले जातात़ मात्र मुंबईत वाहनांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याने वाहतुकीची कोंडी, वाहने उभी करण्याची समस्या व रस्त्यावर बेकायदा पार्किग वाढू लागली आह़े या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पार्किगचे नवीन धोरण पालिकेने आणले आह़े