Join us

नवीन पनवेल ते खांदेश्वर बससेवा सुरू

By admin | Updated: March 25, 2015 01:07 IST

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नवीन पनवेल - खांदेश्वर बससेवा मंगळवारपासून सुरू झाली.

पनवेल : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नवीन पनवेल - खांदेश्वर बससेवा मंगळवारपासून सुरू झाली. नवीन पनवेलमधील प्रवासी आणि सिटीझन युनिटी फोरमने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाकडून ही बससेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे आता खांदा वसाहतीतून खांदेश्वर व नवीन पनवेलमधून पनवेल रेल्वेस्थानक पाच ते सात रुपयांमध्ये गाठता येणार आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानकावर फक्त खांदा गावातीलच रिक्षावाले व्यवसाय करीत असल्याने रिक्षांची संख्या व प्रवासी यांच्यामध्ये प्रचंड तफावत होती, त्यामुळे अनेकदा रिक्षा न मिळाल्याने खांदा वसाहत व नवीन पनवेलला जाणाऱ्यांना चालत यावे लागे. तर काही वेळा शेअर रिक्षांमध्ये पाच ते सहा प्रवाशांना कोंबले जायचे. पैसे देऊनही प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. खांदेश्वर रेल्वे स्थानकावर बस टर्मिनल्स बांधून अनेक वर्षे झाली तरी बससेवा सुरू होत नव्हती. काही वर्षांपूर्वी एनएमएमटीने बस सुरू केली. मात्र विरोधामुळे बंद झाली. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे खांदा वसाहत व नवीन पनवेलमध्ये अंतर्गत बससेवेबाबत एनएमएमटीकडे पाठपुरावा सुरू ठेवल्याचे सिटीझन युनिटी फोरमचे प्रमुख अरुण भिसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)च्गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटाला बस या मार्गावरून धावणार आहे. सकाळी ६.३० वाजता विचुंबे पुलाजवळून पहिली गाडी सोडण्यात येणार असून खांदेश्वर रेल्वेस्थानकातून ६.४०ला पहिली बस नवीन पनवेलकडे रवाना होईल. च्तर खादेश्वर स्थानकातून रात्री १०.३५ वाजता विचुंबेसाठी शेवटची बस सुटेल. या बसचे किमान पाच रुपये व कमाल ११ रुपये भाडे आहे. च्शंभर ते सव्वाशे रुपयांचा प्रवास फक्त ११ रुपयांमध्ये करता येणार असल्याने या परिसरातील रिक्षावाल्यांच्या लुटमारीला चाप बसणार आहे. या मार्गावरून धावणारविचुंबे पूल, विसपुते कॉलेज, अशोक अपार्टमेंट, पनवेल रेल्वेस्थानक, अभ्युदय बँक, बांठिया विद्यालय, कालिकामाता मंदिर, अयप्पा मंदिर, तेरणा हॉस्पिटल, आदई सर्कल, शिवम आर्किट, तलाव, सूर्यदर्शन सोसायटी, आदई फाटा, आंबेडकर उड्डाणपूल, पेट्रोल पंप, आयकर आॅफिस, मोठा खांदा, खांदेश्वर रेल्वेस्थानक