Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेलमध्ये सात तास बत्ती गुल

By admin | Updated: June 15, 2015 05:54 IST

मागील अनेक दिवसांपासून नवीन पनवेल, खांदा कॉलनीमधील विजेचा सावळागोंधळ सुरूच आहे. रविवारी खांदा कॉलनी सेक्टर सातमधील वीज संयंत्रावर जोरदार

पनवेल : मागील अनेक दिवसांपासून नवीन पनवेल, खांदा कॉलनीमधील विजेचा सावळागोंधळ सुरूच आहे. रविवारी खांदा कॉलनी सेक्टर सातमधील वीज संयंत्रावर जोरदार पावसामुळे झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे रहिवाशांना सात तास अंधारात राहावे लागले.खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला आहे. अनेक वेळा सिडकोच्या माध्यमातून याठिकाणी कामे करत असताना विद्युतवाहिन्या तुटल्या जातात. मात्र यावेळी कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे रहिवाशांना तासन्तास अंधारात राहावे लागते. महावितरणकडे अत्याधुनिक व्यवस्था नसल्याने गरज पडल्यास वाशी याठिकाणाहून मदत मागविली जाते. कामाचे नियोजन नसल्याने अनेक वेळा गंभीर परिस्थिती उद्भवते. येथील पाणीपुरवठा देखील वेळोवेळी खंडित होत असून दुहेरी संकटांना रहिवाशांना सामोरे जावे लागते.