Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेल चौदा तास अंधारात

By admin | Updated: November 7, 2014 01:17 IST

नवीन पनवेलमधील नागरिकांना गुरुवारी सुमारे चौदा तास आंधारात रहावे लागले. यामुळे याठिकाणच्या नागरिकांची पुरतीच गैरसोय झाली.

नवी मुंबई : नवीन पनवेलमधील नागरिकांना गुरुवारी सुमारे चौदा तास आंधारात रहावे लागले. यामुळे याठिकाणच्या नागरिकांची पुरतीच गैरसोय झाली. सुट्टीचा दिवस व प्रचंड उकाड्यामुळे जवळ जवळ अर्ध्या नवीन पनवेलवासियांना विविध समस्यांना समोरे जावे लागले. किरण चावदरे यांनी सांगितले की, सकाळपासून याठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. तसेच गुरुनानक जयंती असल्यामुळे शहरात गुरुद्वारामध्ये रेलचेल सुरु होती. वीजपुरवठा खंडित झाल्यमुळे त्याठिकाणी देखिल विविध समस्या उदभवल्या होत्या. या प्रकाराबाबत महावितरणचे अधिकारी म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)