पेण : कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांना नव्या संधी केंद्र व राज्य सरकारकडून मिळत आहे. शेती करण्याची जिद्द आणि परिश्रमाची जोड देवुन पेणच्या गागोदे बुद्रुक येथील शेतकरी भरत मोरू महाडीक यांनी आपल्या पावणेपाच एकर शेतीपैकी १० गुंठयावर नेटशेड उभारून जराबेरा फुलशेतीचा यशस्वी प्रकल्प राबविला आहे. बदलत्या प्रवाही जीवन शैलीत पावसाच्या शेतीचा भरवसा दिवसागणिक तापमानातील होणारे बदलामुळे मान्सुनवर आधारीत खरीप हंगाम शेती शेतकऱ्यांसाठी तोटयाची ठरत आहे. मात्र आमची माय कधी उपाशी ठेवत नाय या कष्टकरी शेतकऱ्यांची परिश्रम व अपार कष्ट करण्याची वृत्तीमुळे शेतीकरण्याचा मोह सुटत नाही. याचे कष्टकरी वृत्तीमुळे नाविण्यापूणर्् कृषीतंत्रज्ञानातून मिळालेली नवी संधी व नवा आत्मविश्वासात महाडीक यांच्या जराबेरा फुलशेतीचा गंध या परिसरात सौदर्य आणि निसर्गशोभा यांचा सुरेख संगम आहे.गतवर्षी फुलशेती हा मुळत: हा भात शेतीसाठी पुरक कृषी व्यवसाय ठरू शकतो म्हणुन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने त्यांनी जराबेरा फुलशेती करण्यासाठी धाडसी पाऊल उचलले. पेण-खोपोली रोडवर, विनोबांच्या जन्मगाव असलेले गागोदे बुद्रक या गावापाशीच रोडच त्यांचा शेडनेटमध्ये हा फुलशेती प्रकल्प आहे. १० गुंठे जागेत ५० रांगामध्ये तब्बल ६००० जराबेराची फुलझाडे रोप त्यांनी लावली, पाणी व्यवस्थापन, खते व औषध ही सारी प्रक्रीया तुषार सिंचन पध्दतीने केली जाते गेले सहा महिन्यांपासुन त्यांना या प्रकल्पातुन उत्पादन मिळण्यास सुरूवात झाली. ही लावलेली झाडे तब्बल पाच वर्षे उत्पादन देतात. फुलांना मार्केट मिळत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
नव्या संधीतून मोहरला जरबेलाचा गंध!
By admin | Updated: July 13, 2014 23:20 IST