Join us  

नवा लूक, नवा संकल्प; अभिजीत बिचुकलेंची ऑफर, आपण २८८ जागा लढवू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 1:52 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत बिचुकले यांनी निवडणुकांचा संकल्प बोलून दाखवला.

मुंबई - बिग बॉस फेस आणि देशातील प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिजीत बिचुकले यांनी नवा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचा नवीन लूकही पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४९ व्या शिवराज्याभिषेक दिनी आपण हा संकल्प करत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, सर्वच राजकीय पक्ष आणि नेते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन केवळ राजकारण करतात, असा टोलाही बिचुकले यांनी यावेळी लगावला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत बिचुकले यांनी निवडणुकांचा संकल्प बोलून दाखवला. तसेच, राज्यातील सर्वच मुलींना, अगदी बालवाडीपासून ते १० वी पर्यंत सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यात यावं. मग, खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधूनही ते शिक्षण मोफत मिळावं अशी माझी मागणी आहे. कारण, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या नावाचा वापर करुन केवळ राजकारण केलं जातं. त्यांच्या विचारांवर चालण्याचं काम राजकीय नेतेमंडळी करत नाहीत. कधी या पक्षात कधी त्या पक्षात उड्या मारतात. म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४९ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आम्ही २८८ जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याचा संकल्प केला आहे. या निवडणुका अभिजीत बिचुकले आणि अलंकृती बिचुकले यांच्या नेतृत्त्वात लढवल्या जातील, असेही ते म्हणाले. 

तरुणाईला आवाहन

दरम्यान, नवीन तडफदार आणि होतकरु व समाजाचा कळवळा असलेल्या सर्व बंधु-भगिनींना माझं आवाहन आहे. आपण, माझ्या नेतृत्त्वात विधानसभेची तयारी करावी, आपण २८८ जागांवर निवडणूक लढवू, असे आवाहन अभिजीत बिचुकले यांनी केलं आहे. नवीन लूकमध्ये नवा संकल्प बिचुकले यांनी केला आहे. 

टॅग्स :अभिजीत बिचुकलेनिवडणूकछत्रपती शिवाजी महाराजराजकारण