Join us

नवीन लोकल फे:यांची करा प्रतीक्षा

By admin | Updated: November 11, 2014 00:55 IST

गर्दी कमी करण्यासाठी लोकल फे:या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी करीत रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या हाती यापुढे निराशाच येण्याची शक्यता आहे.

मुंबई - गर्दी कमी करण्यासाठी लोकल फे:या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी करीत रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या हाती यापुढे निराशाच येण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर होत असलेल्या लोकल फे:या आणि त्यामध्ये नवीन फे:यांसाठी उपलब्ध नसलेली जागा पाहता फे:यांसाठी प्रवाशांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. त्यामुळे गर्दी आटोक्यात येण्यासाठी भविष्यातील मेट्रो प्रकल्पांकडे पश्चिम रेल्वे प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे. 
गेल्या अनेक महिन्यांपासून पश्चिम रेल्वेच्या लोकल काही ना काही कारणास्तव उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवर सुरू असलेली कामे आणि त्यातच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी पर्यायी नसलेला मार्ग यामुळे सगळा गोंधळ उडून गाडय़ांना लेट मार्क लागत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील सगळी कामे वेळेवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. पश्चिम रेल्वेवर एमयूटीपी-1 मध्ये असणा:या माहीम ते बोरीवली या पाचव्या मार्गाचे काम फक्त वांद्रे ते सांताक्रूझ पट्टय़ात बाकी आहे. 
खारजवळ असणा:या हार्बरवरील एका रेल्वे पुलाचा अडथळा या कामात येत आहे. हा पूल तोडण्यात येणार आहे. जोर्पयत दुसरा पूल तयार होत नाही तोर्पयत सध्याचा पूल न तोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करून पाचवा आणि सहावा मार्ग उपलब्ध होण्यास साधारण दोन ते तीन वर्षे लागणार आहेत. परंतु  प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पाचवा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लोकल गाडय़ांचे वेळापत्रक पूर्ववत होण्यास मदत मिळेल, अशी आशा रेल्वेकडून व्यक्त केली जात आहे. 
असे असतानाच आता आणखी एक अडचण पश्चिम रेल्वे प्रशासनाला सतावणारी असून, त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या 90 लोकलच्या जवळपास 1,300 फे:या होत असून 35 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास करताना मोठय़ा प्रमाणात गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त फे:या देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते. मात्र सध्या पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या फे:यांमध्ये यापुढे वाढ होणो कठीण असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. 
लोकल फे:या दर तीन ते चार मिनिटांनंतर धावत असून आणखी फे:या वाढवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे सध्याच्या लोकल फे:यांमध्ये वक्तशीरपणा आणण्याबरोबरच लोकलची प्रवासी क्षमता वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. (प्रतिनिधी)
 
टप्प्याटप्प्याने बम्बार्डियर कंपनीच्या नवीन लोकल येणार आहेत. तसेच एसी लोकलही लवकरच येईल. हे पाहता सध्याच्या धावत असलेल्या जुन्या लोकल बदली करून त्यांची जागा येणा:या नवीन लोकल घेतील. त्यामुळे फे:या वाढणार नाहीत, हेच स्पष्ट दिसून येत आहे. 
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर समांतर अशी मेट्रोही भविष्यात धावणार आहे. ती धावल्यास लोकलला होणारी गर्दी कमी होईल आणि लोकल फे:या वाढवण्याचे ‘टेन्शन’ही जाईल, असेही या अधिका:याने सांगितले. मेट्रो-2 चारकोप ते वांद्रे ते मानखुर्द आणि मेट्रो- 3 कुलाबा ते अंधेरी असा प्रकल्प आहे.  
 
नवीन लोकल फे:या वाढवणो हे कठीणच होऊन बसले आहे. त्यामुळे 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांच्या करण्यावर भर देत असून, त्यामुळे प्रवासी क्षमता वाढणार आहे. 
- शरत चंद्रायन (पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी)