Join us

न्यू जर्सीत गणोशोत्सव

By admin | Updated: September 5, 2014 02:23 IST

अमेरिकेतील न्यू जर्सीमधील इसलिन येथे मराठी कुटुंबांकडून यंदाही गणोशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

मुंबई : अमेरिकेतील न्यू जर्सीमधील इसलिन येथे मराठी कुटुंबांकडून यंदाही गणोशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मूळचे नागपूरकर असलेले राजेश पोफळे यांच्या पुढाकारातून मागील 13 वर्षापासून ‘इसलिन गणोश मंडळ’ गणोशोत्सव साजरा करते. महाराष्ट्रापासून दूर अमेरिकेतही नव्या पिढीकडून मराठी संस्कृती जपली जावी. बाळ-गोपाळांवर चांगले संस्कार व्हावे, विद्येच्या देवतेची आराधना व्हावी, या हेतूने उत्सव साजरा करत असल्याचे इसलिन गणोश मंडळाचे अवनीश लिमये यांनी सांगितले. 
मंडळाकडून दरवर्षी एका संकल्पनेवर आधारित आरास केली जाते. यावर्षी प्रफुल्ल मिस्त्री, सोनाली दळवी आणि त्यांच्या सहका:यांनी ‘न्यू यॉर्क स्कायलाईन’ संकल्पनेवर कल्पक पद्धतीने देखावा सादर केला होता. तसेच रूचा जांभेकर व प्रज्ञा सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली बाळ-गोपाळांनी गाण्याची मैफल 
सजविली. न्यू जर्सीतील ‘जल्लोष’ या 
ढोल-ताशा-लेझीम-झांज पथकाने विसजर्न मिरवणुकीचा आनंद द्विगुणित केला. (प्रतिनिधी)
 
सामाजिक बांधिलकी
च्दरवर्षीप्रमाणो यंदाही गणोशाला अर्पण केलेल्या दानाची रक्कम ‘सेव्ह इंडियन फार्मर्स’ संस्थेला देण्यात आली. ‘सेव्ह इंडियन फार्मर्स’ संस्थेतर्फे महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतक:यांच्या कुटुंबांना मदत केली जाते. शेतक:यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जातो.