नवी मुंबई : तुर्भे हनुमाननगरमधील पाणी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने नवीन जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी ६५ लाख रुपये खर्च होणार असून एक वर्षात काम पूर्ण केले जाणार आहे.हनुमाननगर झोपडपट्टीला एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा केला जात आहे. या परिसरामधील बहुतांश भाग उंचावर आहे. सद्यस्थितीमध्ये जमिनीवर असलेल्या १५ हजार लिटर क्षमतेच्या दोन सिंटेक्स टाक्यांमधून पंपाच्या सहाय्याने पाणी १६ हजार लिटर क्षमतेच्या एफआरपी टाकीत चढविले जाते. त्या टाकीमधून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. उंचावरील भागास गुरुत्वीय बलाने पाणीपुरवठा करता येत नाही. पाणीपुरवठ्याची व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. झोपडपट्टीमधील काही भागाला पाणीपुरवठा करता येत नाही. यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन जलकुंभ उभारण्याची मागणी केली जात होती, त्यामुळे पालिकेने नवीन जलकुंभ व एफआरपी टाकी बसविण्याचा निर्णय घेतला आला असून ही समस्या सुटेल. (प्रतिनिधी)
हनुमाननगरमध्ये नवा जलकुंभ
By admin | Updated: December 29, 2014 02:37 IST