Join us

घर खरेदी क्षेत्रात नवा प्रयोग

By admin | Updated: January 31, 2017 02:51 IST

घर खरेदी करताना वा भाड्याने घेताना द्यावी लागणारी रोख रक्कम, दलाली बंद व्हावी आणि खरेदीदारांना वा भाडेकरूंना नाममात्र शुल्कात रजिस्ट्रेशन, कर्जाची सुविधा तसेच सर्व कायदेशीर

मुंबई : घर खरेदी करताना वा भाड्याने घेताना द्यावी लागणारी रोख रक्कम, दलाली बंद व्हावी आणि खरेदीदारांना वा भाडेकरूंना नाममात्र शुल्कात रजिस्ट्रेशन, कर्जाची सुविधा तसेच सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून देण्याचा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या उपस्थितीत त्याची सुरुवात करण्यात आली. राज्यातील १५0 तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात ही सुविधा अंमलात आणण्याचे राजेश खानविलकर यांनी ठरविले असून, या उपक्रमाला ‘आरके होम्स रिअल इस्टेट मॉल’ असे नाव दिले आहे. सहजगत्या आणि विश्वासार्ह पद्धतीने घर निवडता यावे, यासाठीच्या या प्रकल्पात विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील व्यवहार पारदर्शक करणे हा त्यामागील उद्देश असल्याबद्दल प्रकाश आमटे यांनी आनंद व्यक्त केला, तर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, ही आगळी संकल्पना असून, कमी खर्चात त्याद्वारे सामान्यांना घरे आणि संबंधित सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. या व्यवसायातील दलाल हा प्रकार बंद करण्याच्या संकल्पनेचे त्यांनी स्वागत केले. या उपक्रमाला आशीर्वाद देण्यास ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, पुष्कर श्रोत्री, उपेंद्र लिमये, अविनाश व ऐश्वर्या नारकर, संजय व सुकन्या मोने आदी अनेक कलाकार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)