Join us

न्यू दिंडोशी आय.टी. पार्क रोडच्या नाल्याच्या पुनर्बांधणीच्या कामाला झाली सुरवात

By मनोहर कुंभेजकर | Updated: March 15, 2024 21:05 IST

 आमदार सुनील प्रभु यांच्या हस्ते व सुहास वाडकर व इतर मान्यवर नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत नुकतेच या कामाचा शुभारंभ करून  काम सुरू करण्यात आले.

मुंबईन्यू दिंडोशी आय.टी. पार्क रोडचा नाल्याच्या पुनर्बांधणीच्या कामाला झाली सुरवात झाली आहे.सोमवार दि,24 जुलै 2023  रोजी रात्री नागरी निवारा परिषद सोसायटीलगत आय.टी. पार्क रोडचा काही भाग व नाल्याची भिंत कोसळल्याने या रस्त्याची एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.

या अनुषंगाने स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभु यांनी रस्ते व पर्जन्य जल वाहिन्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून नाल्याच्या पुनर्बांधणीचे निर्देश दिले होते. येथे तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी शक्य नसल्याने, वाहतूककोंडी दूर करण्यासाठी लवकरात लवकर नाल्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करणे आवश्यक होते. 

या ठिकाणी कामाच्या जटिलते मुळे तांत्रिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली पुनर्बांधणीची रूपरेषा ठरवून त्याची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आमदार श्री सुनील प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपमहापौर अँड.  सुहास वाडकर यांच्या प्रयत्नातून या कामाची निविदा प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण केले. आमदार सुनील प्रभु यांच्या हस्ते व सुहास वाडकर व इतर मान्यवर नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत नुकतेच या कामाचा शुभारंभ करून  काम सुरू करण्यात आले.

टॅग्स :मुंबईसुनील प्रभू