Join us  

एसटीच्या ताफ्यात नवीन २० बस दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 5:55 AM

एसटीच्या ताफ्यात नवीन बनावटीच्या २० बस दाखल झाल्या आहेत. विनावातानुकूलित ३० आसनी आणि १५ स्लीपर असा ४५ सीटच्या बस कोल्हापूर आगारात दाखल झाल्या आहेत.

मुंबई : एसटीच्या ताफ्यात नवीन बनावटीच्या २० बस दाखल झाल्या आहेत. विनावातानुकूलित ३० आसनी आणि १५ स्लीपर असा ४५ सीटच्या बस कोल्हापूर आगारात दाखल झाल्या आहेत. या बस मुख्यत: रातराणी बसच्या जागी लांब पल्ल्यांच्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्रीचाप्रवास अधिक आरामदायी होईल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला. रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शयनयान वातानुकूलित एसटीचे तिकीट दर परवडत नाहीत. यामुळे विनावातानुकूलित शयनयान बस बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्याप्रमाणे, २० नवीन बनावटीच्या बस बांधण्यातआल्या. एमजी आॅटोमोटिव्हस या कंपनीने या बसची बांधणी केली आहे. येत्या काळात नवीन बनावटीच्या २०० बस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जातील. या नवीन बनावटीचे तिकीट दर निमआराम बसप्रमाणेच असणार आहे. आरामदायी आसन, प्रवाशांसाठी छोट्या आकाराचा पंखा, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, अशा सुविधा या बसमध्ये देण्यात आल्या आहेत.पारगड (कोल्हापूर) ते परळ, पाटगाव (कोल्हापूर) ते परळ, चिखली (बुलडाणा) ते मुंबई सेंट्रल, सांगली ते मुंबई सेंट्रल, अमळनेर (जळगाव) ते मुंबई सेंट्रल या मार्गावरून नवीन बनावटीच्या बस धावणार आहेत.