Join us  

बेस्ट बसच्या नूतन बस पासवर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:38 AM

बेस्टच्या बसमधून सवलतीत प्रवासाबाबत प्रशासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला माहिती तंत्रज्ञान विभागाने परस्पर मनमानी करीत, गेल्या महिन्याभरापासून नवीन पास बनविणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत.

मुंबई : बेस्टच्या बसमधून सवलतीत प्रवासाबाबत प्रशासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला माहिती तंत्रज्ञान विभागाने परस्पर मनमानी करीत, गेल्या महिन्याभरापासून नवीन पास बनविणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सवलतीसाठी पात्र असणाºया घटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, पास देणे बंद करण्याबाबत कसलाही निर्णय झाला नसताना, आयटी व्यवस्थापक एस़ जाधव यांनी आपल्या अधिकारात परस्पर त्यावर अडकाटी घातली आहे. बेस्टच्या बसमधून प्रवासासाठी २०१३ मधील ठराव आणि बेस्ट समितीच्या १५ मे २०१५ च्या बैठकीतील निर्णयानुसार, अधिस्वीकृतधारक पत्रकारांना सवलतीच्या दरात बस पास दिला जातो. मात्र, गेल्या महिन्याभरापासून माहिती तंत्रज्ञान विभागाने नवीन पास बनवून देण्याचे बंद केले आहे.विशेष म्हणजे, सवलतीसाठी आवश्यक असलेल्या निकषाची छाननी केल्यानंतर, बेस्टच्या जनता संपर्क विभागाकडून त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी ‘आयटी’ विभागाला पत्र दिले जाते. याबाबत बेस्टचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाचे जाधव यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी पास देण्याचे बंद केले आहे. मात्र, त्याबाबत कोणताही लिखित स्वरूपाचा निर्णय झालेला नाही. ‘ट्रायमॅक्स’ची सेवा बंद झाल्यापासून नवीन पास दिले जात नाहीत, असे सांगितले, त्यावर डिजिटलऐवजी पूर्वीप्रमाणे साधे ओळखपत्र का देत नाही, असे विचारल्यावर उडवाउडवीचे उत्तर देत फोन कट केला.

टॅग्स :बेस्टमुंबई