Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेक द चेन’ नवीन नियमावलीमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:06 IST

मुंबई : राज्य सरकारच्या नियमावलीप्रमाणे मुंबईची वाटचाल लेव्हल १ च्या दिशेने सुरू आहे; पण मुंबईत पुढील आठवड्यातही लेव्हल ३ ...

मुंबई : राज्य सरकारच्या नियमावलीप्रमाणे मुंबईची वाटचाल लेव्हल १ च्या दिशेने सुरू आहे; पण मुंबईत पुढील आठवड्यातही लेव्हल ३ नुसार निर्बंध लावले जाणार आहेत. त्यामुळे आणखी आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा सवाल व्यापारी संघटनेने केला आहे.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह म्हणाले की, निर्बंधातून पुढील आठवड्यात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. दुकानदार आणि हॉटेलचालकांसाठी हा कठीण काळ आहे. भाडे, कर, कामगारांचे पगार आणि इतर खर्च कसा द्यावा, असा प्रश्न आहे. फेरीवाल्याकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होते ते कोरोना पसरण्यास कारणीभूत ठरत आहेत, आम्ही कोरोनाचे नियम पाळत आहोत, तरीही वेळेचे बंधन आहे, असेही ते म्हणाले.