मुंबई : प्रीती ङिांटा विनयभंग प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस उद्योगपती नेस यांनी दिलेल्या साक्षीदारांचे जबाब उद्यापासून नोंदवू शकतात.
प्रीतीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नेस यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी प्रीतीच्या बाजूच्या बहुसंख्य साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान, नेस यांनीही पोलिसांना नऊ जणांची नावे देत या व्यक्ती तटस्थपणो घडलेली घटना सांगू शकतील, असा दावा केला होता. यात पूजा दादलानी, शरथ नाथ आणि कमलेश शहा यांचा समावेश आहे. पोलिसांनी या तिघांशी संपर्क साधण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र ते व्यर्थ ठरले. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांनी मुंबईबाहेर असल्याची सबब दिली. कमलेश फोन उचलत नाहीत, तर नाथ यांचा फोन बंद आहे. उर्वरित सहा साक्षीदारांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
मिलर, जीन यांचे ऑनलाइन जबाब
प्रीतीने साक्षीदार म्हणून उल्लेख केलेल्या जीन आणि खेळाडू डेव्हिड मिलर याच्या वडलांनी ईमेलद्वारे आपला जबाब दिला आहे. या दोघांनी प्रीतीच्या तक्रारीत तथ्य असल्याचे नमूद केल्याचे समजते.